
अयोध्या – सोमवारपासून तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांनी सरकारकडे उपोषणाला बसत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. त्याचबरोबर देशातील मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही केली त्यांनी यावेळी केली आहे. यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण परमहंस दास यांनी केले आहे.
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी महंत परमहंस दास यांचे आमरण उपोषण
अयोध्येत परमहंस दास हे राहत असून तपस्वी छावनीचे ते महंत आहेत. ते मुस्लिमांविरोधातील वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. संत परमहंस यांनी ऑक्टोबर 2018मध्ये अनेक दिवस राम जन्मभूमीसाठी आमरण उपोषण केले होते. त्यांनी 1 ऑक्टोबर 2018 रोजी अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. प्रशासनानेही अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर उपोषणाच्या सातव्या दिवशी पोलिसांनी त्यांना बळजबरीनेच आजारपणाचा हवाला देत उचलले होते आणि पीजीआयमध्ये दाखल केले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून आणि ज्यूस देऊन त्यांचे उपोषण संपवले होते.
तपस्वी छावनी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा परमहंस दास यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता तयार करून आत्मदहन करण्याचा निर्णय देखील घेतला होता. महंत परमहंस दास राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने नाराज होते. पण परमहंस यांना दोन दिवस आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांना, सीजीएम न्यायालयातही दाखल करण्यात आले होते. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
