
एका दैनिकाने दोन वर्षांपूर्वी उपवर मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. सर्व मुलींनी एकमुखाने शेतकरी नवरा नको असे निक्षुन सांगितले. मात्र आता बदल झाला आहे. सांगलीत गेल्या आठवड्यात झालेल्या एका वधुवर परिचय मेळाव्यात अनेक मुलींनी शेतकरी नवरा चालेल असे म्हटले आहे. या मागची नेमकी भूमिका काय आहे हे माहीत नाही पण गेल्या दोन तीन वर्षात भाजीपाला आणि फळांना चांगला भाव येत असल्याने शेती हेही एक करीयर आहे असे लोकांना वाटायला लागले आहे. आज ना उद्या शेतीतले तंत्रज्ञान सुधारेल आणि शेती व्यवसाय करणारेही सुखी संपन्न होतील.
