नौदलातल्या करीयरसाठी

अनेक तरुणांना समुद्राचे आव्हान साद घालत असते. समुद्रात किंवा भारताच्या नौदलात चांगले करीयर करण्यास आसुसलेल्या अशा तरुणांना नौदलात भरती होणे सोपे जाते. यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाची गरज असते. असे प्रशिक्षण देण्यासाठी १९९८ साली नॅवल मॅराटाईम अकॅडमी ही  संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नॅवल कमांड म्हणजे पश्‍चिम विभागातर्फे हा निमशासकीय विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याचे स्वरूप खाजगी पण कल्याणकारी संस्था असे आहे. पण तिला अधिकृतता आहे. भारतीय नौदलात भरती केल्या जाणार्‍या नाविकांना ज्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच दर्जाचे प्रशिक्षण या अकॅडमीत दिले जाते. या संस्थेतले प्रशिक्षण भारतीय नौदल, तटरक्षक दल, इंडियन कस्टम्स्, डायरेक्टर जनरल ऑफ हायट्रोकार्बन्स, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ याशिवाय इतर काही प्रतिष्ठित कंपन्यांनी प्रायोजित केलेले असते. यातल्या काही संस्था, संघटना आणि यंत्रणांतल्या कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या अकॅडमीवर टाकली जाते. त्यामुळे नौदलात किंवा सागरी वाहतूक करणार्‍या कंपन्यांत नोकरी करू इच्छिणार्‍यांना या अकॅडमीतले प्रशिक्षण उपयुक्त ठरते.

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपासून अभियांत्रिकी आणि इतरही पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या अकॅडमीतर्फे निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते आणि तसे अभ्यासक्रम आयोजित केले जातात. इच्छुकांनी अकॅडमीची माहिती मागवून घेऊन आपल्याला योग्य वाटेल तो अभ्यासक्रम  निवडावा. समुद्रावरच्या काही नोकर्‍यांसाठी काही खास कौशल्यांची गरज असते. अशा कौशल्याचे प्रशिक्षण देणारेही काही अभ्यासक्रम या अकॅडमीत आहेत. काही नोकर्‍या समुद्राशी संबंधित असतात पण त्या नोकर्‍यांसाठी समुद्रावर जाण्याची गरज नसते. अशा किनारी नोकर्‍यांबाबतचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमीत दिले जाते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी खालील पत्यावर संपर्क साधावा. आय.एन्.एस. कंजाली, आर.सी. चर्च, कुलाबा मुंबई ४००००५ फोन क्र. ०२२-२२१८७८६१ इमेल- www.namacindia.com

1 thought on “नौदलातल्या करीयरसाठी”

 1. Dhiraj shankhpal

  Majhe 2year experience aahet mi fitter I.t I government jhala
  M&m satpu.nashik CO and m&Sona cha
  2yearcha experience aahet
  Mi job cha shodh ghet aahet
  Mjha mo no -8275129917

Leave a Comment