निद्रावस्थेतील लकवा

झोपेत किंवा झोपेतून उठल्यानंतर लक्षात येते की आपला एखादा अवयव निर्जिव झाला आहे. कालपर्यंत हालचाल करणारा तो अवयव आता आपल्या शरीराचा जणू भागच नाही असा अलिप्त झाला आहे. त्याचे हे निर्जिवपण सोसावे कसे? शरीराच्या संपूर्ण अवयवास अथवा एखादा बाह्य भागास रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्यापूर्वी आलेला निर्जिवपणा म्हणजेच निद्रावस्थेतील लकवा होय. निद्रावस्थेतील हा आजार सामान्य लोकांमध्ये ज्यांना निद्रानाशाचा त्रास अथवा सौम्य प्रमाणातील भ्रमाचा त्रास जाणवतो. त्या व्यक्तींमध्येमध्ये आढळून येऊ शकतो. निद्रेदरम्यान जेव्हा शरीर शिथील होते, त्या अवस्थेशी हा आजार निगडित आहे. निद्रावस्थेतील व्यक्तींच्या शरीराविषयी बरीच कमी माहिती सध्या उपलब्ध आहे.

लक्षणे – लकवा आल्यानंतर रूग्ण शुद्धीत असतो. परंतु तो हालचाल करू शकत नाही अथवा बोलू शकत नाही. रूग्णाला ध्वनीभ्रम, गंधभ्रम, भीती आणि काल्पणिक भीतीयुक्त संकल्पना मनात येऊ शकतात. निद्रावस्थेतील लकवा हा शक्यतो रूग्ण गाढ झोपेत असताना किंवा त्यातून बाहेर येताना होतो. या झोपेच्या दरम्यान शरीराचा मेंदूशी संफ मुख्यत्वे तुटतो. जेणेकरून शरीर अचेतन अवस्थेत जाते.

मन – शरीर यांची वारंवार सांगड तुटल्यामुळे निद्रावस्थेतील लकवा होतो. निद्रावस्थेतील लकव्याच्या आघातात बहुतांशी अपायकारक नसून, ठराविक काळापर्यंत मर्यादित असतो. हा आघात एक ते दोन मिनिटांपर्यंत अथवा मन व शरीर यांचा संफ तुटलेला असतोवर असतो. रूग्ण स्वतः हालचाल करू शकतो. परंतु निद्रावस्थेतील भितीयुक्त संकल्पनेच्या दडपणाखाली जास्त कालावधीपर्यंत राहू शकतो. क्वचित निद्रावस्थेतील आघातात मृत्यूचा संभव होऊ शकतो. आधी क्वचित समजला जाणारा आजार आता ५० टक्के लोक त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवतात. निद्रावस्थेत बर्‍याच वेळा दीर्घकालीन विमान प्रवासानंतर किंवा फार काळापर्यंत झोप न दिल्यामुळे तो होऊ शकतो. स्त्री- पुरूष दोघांमध्ये हा आजार समानतेने आढळतो. हा आजार सर्व वयांमध्ये आढळतो. परंतु तरूणांमध्ये जास्त आढळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment