नखे अशी सांभाळा

आपल्या शरीरातील कोणताही अवयव मग तो छोटा असो वा मोठा जोपर्यंत स्वस्थ असतो आणि त्याच्या कार्यात कुठेही बाधा येत नसते तोपर्यंत शरीरात कोणत्याही व्याधी निर्माण होत नसतात. मात्र कांही वेळा अगदी बारीकसारीक दुखणीही कमालीची वेदनादायक ठरतात. आपल्या बहुतेक सर्व कामामध्ये हाताची बोटे आपण वापरत असतो. अनेकवेळा या बोटांच्या नखांना इजा होतात आणि त्यात पाणी जाऊन पू होतो आणि मग बोटांना ठणका लागतो. त्यावेळी हे उपाय करून पहावेत.

१) नख दुभंगणे, जिव्हाळे लागणे – ज्या बोटाला हा विकार असेल त्या बोटाला घटट चिकटपटटी बांधावी. हा विकार अगदी थोडक्या काळासाठी असतो व बरेच वेळा १-२ दिवसातच बरा होतो.

२) नखुरडे- बर्‍याचवेळा नखुरडे झाल्याने बोटाला ठणका लागतो. यातही बोटाला चिकटपट्टी घटट बांधल्यास नखुरडे लवकर फुटते. दुसरा उपाय म्हणजे शेंदूर व अंडयाचा पांढरा बलक खलून लावल्याने आराम पडतो. शेंदूर हा अँटीसेप्टीक म्हणून काम करतो.

३) हाताच्या बोटांची तसेच पायाच्या बोटांची नखे वेळच्यावेळी कापणे, त्यात अडकलेली घाण वेळच्यावेळी काढणे हे एकंदर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. वय वाढत जाईल तसा नखांचा कडकपणा वाढत जातो. वृद्ध वयात तर नखे कापणेही अवघड जाते. अशावेळी पाण्यात बोरीक पावडर टाकून पाय थोडा वेळ बुडवून ठेवावेत व मग नेलकटरच्या सहाय्याने नखे कापावीत.
अंघोळ झाल्यानंतरही नखे गरम पाण्यामुळे मऊ पडलेली असतात. त्यावेळी ती काढावीत. तसेच नखे कापताना अगदी त्वचेजवळ कापू नयेत. त्यामुळे जिव्हाळे लागण्याचा संभव कमी होतो.

४) अगदी लहान बाळाची नखे कापतानाही बाळाची अंघोळ होऊन बाळ झोपले की मगच ती अलगद काढावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment