कॅलरी कमी करण्यासाठी थरारपट पाहा!

लंडन,३१ ऑक्टोबर-स्त्री असो की पुरुष, सध्या सगळेजण आपल्या ’लुक’बद्दल जागरूक झाले आहे. आपल्या वाढत्या वजनाबाबत तर प्रत्येकालाच चिंता असते. मग त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम, योगोसने, सकाळी फिरायला जाणे, असे नाना उपाय केले जातात. मात्र हे सर्व उपाय करण्याऐवजी थरारपट पाहून वजन कमी करता येऊ शकते, असे सांगितले तर कुणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही.

पण लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठात यासंदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. वजन कमी करण्यासाठी संशोधकांनी एक मजेशीर उपाय शोधला आहे. सकाळी फिरण्यामुळे आपल्या शरिरातील जेवढा उष्मांक (कॅलरी) कमी होतात तेवढ्याच एखादा थरारपट पाहिल्यानंतरही कमी होऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे.

ज्यांना आपले वजन घटवायचे आहे, त्यांना अशा थरारपटांचा फायदा होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एक तास चालण्याने आपल्या शरीरातील जेवढ्या कॅलरी कमी होतात, तेवढ्या कमी करण्यासाठी ९० मिनिटांचा थरारपट पाहणे पुरेसे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
कॅलरी कमी करणार्‍या दहा निवडक थरारक चित्रपटांची यादी देखील शास्त्रज्ञांनी दिली आहे. एवढेच नाही तर हे चित्रपट पाहिल्यानंतर किती कॅलरी कमी होऊ शकतील, याचा एक तत्त*ाही तयार करण्यात आला आहे.
१. द शायनिंग – १८४ कॅलरी
२. जॉज् – १६१ कॅलरी
३. द एक्झॉर्सिस्ट – १५८ कॅलरी
४. एलियन – १५२ कॅलरी
५. सॉ – १३३ कॅलरी
६. अ नाईटमेअर ऑन एल्म स्ट*ीट – ११८ कॅलरी
७. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी – १११ कॅलरी
८. द ब्लेअर विच प्रोजेक्ट – १०५ कॅलरी
९. द टेक्सास चेन सॉ मॅसॅकर – १०२ कॅलरी
१०. (आरईसी) – १०१ कॅलरी

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment