अमेरिकेत सापडली तृतीयपंथी चिमणी

फोटो साभार दैनिक भास्कर

अमेरिकेच्या पेनसिल्वानिया मधील पाउडरमिल नॅचरल रिझर्व मध्ये संशोधकांना तृतीय पंथी म्हणजे अर्धा नर आणि अर्धी मादा चिमणीचा शोध लागला आहे. या चिमणीला रोझ ब्रेस्टेड ग्रुजबिक्सन असे म्हटले जाते. या प्रकारची चिमणी दुर्मिळ मानली जाते. मिळालेल्या माहितीनुसार ६४ वर्षापूर्वी याच प्रकारची तृतीयपंथी चिमणी याच भागात आढळली होती.

या चिमणीचा अर्धा भाग नर चिमण्याचा तर अर्धा भाग मादा चिमणीचा आहे. नर भागात काळे आणि मोठे पंख आहेत तर मादा भागात तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे पंख आहेत. या चिमणीच्या छातीवर ठिपके नाहीत ते मादा चिमणीचे लक्षण आहे. संशोधक सांगतात जेव्हा एकच चिमणीमध्ये नर आणि मादा असे शरीर दिसते त्याला गाएंड्रोगॉरफी असे म्हटले जाते.

याचा अर्थ अंडी घालताना एकाचा अंड्यात नराचे दोन स्पर्म दोन वेगळ्या न्युक्लीअस म्हणजे केंद्रासह असतात. अश्या वेळी अंड्यातील बलकात नर आणि मादाचे दोन क्रोमोसोम कमी असतात. संशोधक एनी लिंडसे यांच्या मते अशी चिमणी पाहायला मिळणे हा आयुष्यातील अद्भूत अनुभव आहे. सर्वसामान्यपणे चिमणीच्या उजव्या भागात अंडकोश असतो. त्यामुळे ही चिमणी सुद्धा अंडी देऊ शकते.

ही चिमणी भविष्यात नर चिमणा म्हणून वागेल की मादा चिमणा म्हणून वागेल याचा अंदाज त्याचा आवाज कसा आहे त्यावर ठरेल. नर चिमण्याप्रमाणे गुणगुण आवाज येत असेल तर मादा चिमणी त्याच्याकडे आकर्षित होईल अथवा ही चिमणी अन्य नर चिमण्याकडे आकर्षित होईल.