झहीर खान-सागरिका होणार आई-बाबा?


काही दिवसांपूर्वीच टीम इंडिया माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने आपला वाढदिवस साजरा केला. त्याची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने यावेळी एक खूप छान फोटो शेअर केला होता. याबाबत नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सागरिका सध्या गरोदर असून लवकरच हे जोडपे आई-वडील होणार आहेत. 2017मध्ये झहीर खान आणि सागरिका लग्नाच्या बेडीत अडकले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सागरिका आणि झहीरच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी या वृत्ताला दुजारा दिला आहे. त्यामुळे असे वाटते की लवकरच दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. पण अद्याप सागरिका किंवा झहीरने या वृत्ताला दुजोर दिला नाही.

शाही परिवाराशी संबंधित सागरिका असून तिचे वडील विजेंद्र घाटगे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहेत. त्याचबरोबर सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणादरम्यान अनेक चित्रपट आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. पण तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. ‘चक दे इंडिया’मधून सागरिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्याचबरोबर तिचा पंजाबी चित्रपट दिलदरिया खूप हिट ठरला होता.