आमदार विनय कोरे यांना मातृशोक


सोलापुर – आज वृद्धापकाळाने आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे निधन झाले, वारणा उद्योग समूहाच्या आणि वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा असलेल्या शोभाताई कोरे यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेचा श्वास घेतला.

वारणा भगिनी मंडळ आणि वारणा बझारच्या अध्यक्षपदाची धुरा शोभाताई कोरे यांनी सांभाळली. वारणा पंचक्रोशीतील सांस्कृतीक, धार्मिक, सामाजिक कार्यात त्या कायम सहभागी असायच्या. वारणा भगिनी मंडळ व वारणा बझारच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यात पुढाकार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून शोभाताई आजारी होत्या, त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी वारणा नगर येथे त्यांचे निधन झाले.