काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल होणार खुशबू सुंदर!


नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय प्रवक्ता खुशबू सुंदर यांनी सोडचिठ्ठी दिली असून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना खुशबू यांनी आपला राजीनामा सुपुर्द करतानाच पक्षातील दिग्गज नेत्यांवर निशाणा साधला आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबू यांना भाजपने काँग्रेसला राजीनामा देण्याचे सांगितल्यामुळे त्यांनी काँग्रेस आपला राजीनामा दिला असून, त्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


आपल्या राजीनाम्यात खुशबू यांनी लिहले आहे की, असे काही नेते काँग्रेसमध्ये आहे की, त्यांना सध्याची परिस्थिती काय सुरू आहे हे त्यांना माहित माहिती नाही. जे आदेश त्यांनी दिले त्याचे पालन करावे लागते, त्यामुळे माझ्यासारखे काही जण आपल्या पक्षासाठी चांगले काम करू इच्छितात पण आमच्यावर दबाव टाकण्यात येतो. त्याचबरोबर मी आता काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पद दिल्याबद्दल राहुल गांधींचे आभार सुद्धा मानले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबू सुंदर आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.