आरे कारशेडवरुन कंगना राणावतचा उद्धव ठाकरेंना टोला


मुंबई – राज्यातील जनतेशी संवाद साधत आरेतील जंगल व मेट्रो कारशेड संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असे म्हणत आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार असल्याची घोषणा केली. अभिनेत्री कंगना राणावत हिने त्यांच्या या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. शहराचा विकास काही मोजक्या श्रीमंत लोकांसाठी थांबवणे हा या समस्येवरील उपाय नसल्याचा उपरोधिक टोला तिने उद्धव ठाकरेंना लगावला आहे.


काही फॅन्सी कार्यकर्त्यांची समस्या ही सर्व मुंबईकरांची समस्या असू शकत नाही. मी देखील गेल्या वर्षभरात एक लाखांपेक्षा अधिक रोपे लावली आहेत. झाडांना तोडणे अयोग्यच आहे, पण शहराचा विकास काही मोजक्या श्रीमंत लोकांसाठी थांबवणे हे देखील योग्य नसल्याचे कंगणाने आपल्या ट्विटमध्ये म्हणत महाराष्ट्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.