प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामी प्रकरणी नीलेश राणे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल


बीड : कोकणातील भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर द्वेषभावना पसरविणारी पोस्ट टाकल्याबद्दल केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियात टाकल्याबद्दल पोलिसात ९ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती. केज पोलिसांनी या तक्रारीवरुन नीलेश राणे, विवेक आंबाड (रा. लाडेगाव, ता. केज) आणि रोहन चव्हाण (रा. पळसखेडा, ता. केज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धे करीत आहेत.