टोमॅटो खाण्याने डिप्रेशन होते कमी

आज जगात अनेकांना डिप्रेशनचा त्रास होत आहे. आठवड्यातले काही दिवस आहारात टोमॅटोचा समावेश केला तर डिप्रेशममधून बाहेर पडण्यास मदत होते असे संशोधकांना आढळले आहे.

संशोधकांनी या संदर्भात सत्तर किवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ हजार पुरूष महिलांच्या आहाराच्या सवयींचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की आठवड्यात दोन ते सहा वेळा टोमॅटोचा आहारात समावेश असलेल्यांचे डिप्रेशन ४६ टक्कयांनी कमी झाले. दररोज आहारात टोमॅटो असतील तर डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता ५२ टक्यांनी घटते असेही संशोधकांना आढळले. आहारातील अन्य अन्नपदार्थ किवा भाज्यांपासून हा फायदा मिळत नाही. कोबी, गाजर, कांदे, भोपळा यांचे सेवन मानसिक आरोग्य चांगले राहण्यास पुरेसे उपयुक्त ठरत नाही. मात्र टोमॅटोमधील अँडी ऑक्सिडंट आणि रसायने मानसिक विकारांपासून संरक्षण देण्यास उपयुक्त ठरतात असेही संशोधकांना दिसून आले.

टोमॅटोमधील लायकोपेन हा त्यासाठी चांगला स्त्रोत असून याच द्रव्यामुळे टोमॅटोला गडद लाल रंग येतो. या अँडी ऑक्सिडंटमुळे प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अॅटॅक असे विकार होण्याची शक्यता कमी होते, तणाव कमी होतो आणि मेंदूच्या पेशी डॅमेज होण्याचे प्रमाण घटते असेही संशोधकांना दिसून आले. चीन आणि जपानमधील संशोधकांचे हे संशोधन जर्नल ऑफ अॅफेक्टिव्ह डिसऑर्डर मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment