महिलांच्या आरोग्यासाठी ’व्हीटॅमिन डी’

महिलांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ’व्हीटॅमिन डी’ एक उत्तम गुणकारीक औषध आहे. हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा दावा अभ्यासकर्त्यांनी केला आहे.

महिलांसाठी अल्जायमर म्हणजेच स्मृतीभ्रंशचा अधिक धोका असतो. तसेच महिलांचे आरोग्य चांगले राहावे आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी ’व्हीटॅमिन डी’ची मात्रा लागू पडते. त्यामुळे महिलांनी ’व्हीटॅमिन डी’ला अधिक पसंती देण्याची गरज आहे. अमेरिका आणि फ्रान्समधील अभ्यासकर्त्यांनी महिलांच्या मानिसक आजारावर अभ्यास केला. त्यानंतर ’व्हीटॅमिन डी’ची मात्रा अधिक उपयुक्त पडते, हे सिद्ध केले. ज्या महिलांना स्मृतीभ्रंशचा धोका आहे. त्या महिला या आजारातून बाहेर पडू शकतात किंवा त्यांना तो होण्याचा धोका कमी होतो.

मिनियापोलीस येथील एका मेडिकल सेंटरच्या येलेना स्लीनीन यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या आजाराबाबत संशोधन करण्यात आले. या अभ्यासाच्यावेळी स्मृतीभ्रंश असणार्याक महिलांमध्ये ’व्हीटॅमिन डी’ची मात्रा देण्यात आली. त्यावेळी कमी प्रमाणात डी व्हीटॅमिन असणार्या् महिलांना याचा लाभ झाला. त्यांच्यातील  आजार कमी होण्यास मदत झाली.

व्हीटॅमिन डी ची कमी असणार्यास ६२५७ वृद्ध महिलांचा अभ्यास करण्यासाठी निवड करण्यात आली. तर फ्रान्समध्ये सेड्रीक एनवीलकर यांच्या नेतृत्वाखाली ४९८ महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर महिलांच्या आजाराचा निष्कर्ष काढण्यात आला..
संशोधन करणार्यां नी स्मृतीभ्रंश असणार्याा महिलांना ’व्हीटॅमिन डी’ची मात्रा आठवड्याला ५०.३ मायक्रोग्रॅम पेक्षा कमी आहार घेणार्यांतमध्ये आजाराचे प्रमाण दिसून आले. त्या महिला या आजाराने पिढीत होत्या. अभ्यासकांच्या मते जेवणाव्यतीरिक्त जे ’व्हीटॅमिन डी’ घेत नाहीत. त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता कमी असते. यात पुरूषही मागे नाहीत. तेही कमी सक्रीय असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment