भारतात येतेय ऑडीची स्वस्त कार

फोटो साभार ऑटो कार

ऑडी यांची क्यू २ ही स्वस्त आणि मस्त एसयूव्ही १६ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करत आहे. या कारची खास बात म्हणजे कंपनीचे हे सर्वात स्वस्त व त्यामुळे अफोर्डेबल मॉडेल आहेच पण क्यू सिरीज मधील ही सर्वात छोटी एसयूव्ही आहे. फेस्टिव्हल सिझन लक्षात घेऊन ऑडीने ही कार भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षात ऑडीने ४ मॉडेल भारतीय बाजारात लाँच केली असून आता हे पाचवे मॉडेल कंपनी बाजारात आणत आहे.

या एसयुव्हीला २.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिला गेला आहे. ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला ८.५ सेकंड लागतात आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २१२ किमी. मिळालेल्या माहितीनुसार या एसयुव्हीला रीव्हाइज्ड फ्रंट व रिअर हेडलाईट दिले आहेत आणि ग्रील मेश पॅटर्न वेगळा दिसत आहे. इंटिरीअर मध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम, ड्राईव्ह असिस्टंट अशी फिचर्स आहेत. या कारची भारतातील किंमत अंदाजे ३५ लाखापासून असेल असेही सांगितले जात आहे.