चहा प्या; कर्करोग टाळा

लंडन: भारत आणि पाकिस्तान या देशात पिकणारी चहाची एक विशिष्ट प्रजाती कर्करोगावर रामबाण औषधी असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. या प्रजातीचा चहा प्रामुख्याने स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत गुणकारी असून त्यापासून कोणतेही अपाय होत नसल्याचे संशोधकांना आढळले आहे.

बर्मिंगहॅम येथील एस्टन युनिव्हर्सिटी आणि रसेल्स हॉल हॉस्पिटल येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार फ्रेगोनिया क्रेटिका या नावाची चहाची एक प्रजाती केवळ भारत आणि पाकिस्तानातील कोरड्या हवामानात पिकते. या वनस्पतीमध्ये कर्करोगाचा विनाश करणारे शक्तिशाली घटक आहेत. या घटकामुळे केमोथेरेपीच्या उपचारामुळे मिळणाऱ्या परिणामासारखेच परिणाम मिळतात. मात्र केमोथेरेपीप्रमाणे त्यापासून इतर कोणतेही अपाय होत नाहीत.

शरीरात अस्तित्वात असलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याबरोबरच नवीन पेशींची निर्मिती थांबविण्याचे कामही ही वनस्पती करते; असा संशोधकांचा दावा आहे. या वनस्पतीमधील औषधी घटक ५ तासात कर्करोगाच्या पेशीचा प्रसार रोखते आणि २४ तासात त्यांचा नाश करते; असे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment