किचनमध्ये करा हे प्रयोग

किचनचे कामही मजेदार बनवले जाऊ शकते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे.  होय, येथे अशाच काही टिप्स दिल्या जात आहेत ज्यामुळे तुमचे किचनचे काम मजेदार आणि सोपे होईल.

*बदामावरील टरफल चटकन काढण्यासाठी  बदाम १५ ते २० मिनिट  गरम पाण्यात भिजत ठेवा.
*साखरेच्या डब्यात ३-४ लवंगा टाकल्या तर डब्याला मुंग्या चिकटत नाहीत.
*बिस्किटाच्या डब्याला कागद लावला तर  बिस्कीटे बराच काळ फ्रेश राहतात आणि नरम पडत नाहीत.
*कापलेले सफरचंद लवकरच काळे पडतात. ते टाळण्यासाठी कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावावा. म्हणजे ते बराच काळ काळे पडत नाही.
*कुठेही भाजले असेल तर त्या ठिकाणी केळी कुस्करून लावावे. आराम मिळतो.
*अंडे  ताजे आहे हे ओळखण्यासाठी ते मिठाच्या पाण्यात टाकावे. अंडे जर तळाला गेले तर ते ताजे आहे आणि ते वर तरंगत राहिले तर शिळे आहे, हे ओळखावे.
*लसूण सहजपणे सोलता यावे यासाठी ते पाण्यात भिजवावे आणि नंतर त्याचे टरफल काढावे. दुसरा उपाय असा की, लसणाला थोडेसे गरम करावे. छिलणे सोपे जाते आणि नखांना त्रास होत नाही.
*हिरवी मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिची देठे काढून टाकावीत.
*मटार हिरवे राहण्यासाठी पॉलिथिनमध्ये बांधून फ्रिजमध्ये ठेवावे.

*तसे पाहिले तर तंबाखू आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. मात्र  शरीराच्या एखाद्या अवयवात जास्त वेदना होत असेल तर तो रामबाणाचे  काम करतो.  चघळण्याचा तंबाखू पाण्यात मिसळून वेदना होत असलेल्या ठिकाणी ठेवावा. नंतर कपडा किंवा पट्टी बांधावी. काही मिनिटानंतर वेदना कमी होते.
*कडू कारले टेस्टी आणि  क्रिस्पी बनविण्यासाठी ते मधोमध कापून अर्धा तास मीठ, पिठ आणि दह्यात ठेवावे.
*भांडे जळाले असेल तर त्यात कापलेले कांदे आणि गरम पाणी टाकून ५ मिनिटे ठेवावे आणि नंतर स्वच्छ करावे. भांडे  चकाचक होईल.
*मिरची पावडर लवकर खराब होऊ नये यासाठी त्यात हिंगाचे पाकिट ठेवावे. मिरची पावडरमध्ये गाठी पडत नाही.
*भाजी कापण्यासाठी लाकडी बोर्डाचा वापर करावा. त्यामुळे चाकूची  धार खराब होत नाही. चुकूनही प्लास्टिक बोर्डाचा वापर करू नका. कारण त्याचे छोटे-छोटे तुकडे भाजीत जाण्याची भीती असते.
*धने किंवा पुदीना  ताजा ठेवण्यासाठी ते मलमलच्या कपड्यात गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे. फ्रेश राहते.
*घरात झुरळ त्रास देत असतील तर किचन आणि  घराच्या कोपर्यातत बोरिक पावडर टाका. झुरळ पुन्हा घरात येणार नाहीत. 
*डोशाचे मिश्रण बनविण्याआधी भिजलेल्या तांदळात अर्धा चमचा मेथी टाकली तर  डोसा आणखी  क्रिस्पी व कुरकुरा होतो.
*कच्चा आंबा अथवा कोणतेही फळ पिकवण्यासाठी ते वृत्तपत्रात गुंडाळून एखाद्या  गरम ठिकाणी ठेवावे.  दोन तीन दिवसांत फळे  पिकतात.
*उरलेले अन्न फेकून देऊ नका.त्यापासून टेस्टी पदार्थ तयार करता येतात. भाजी उरली तर त्यापासून पराठे, उरलेली दाळ पिठात मिसळून भाकरी, करता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment