काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या

लंडन, ११ ऑक्टोबर-दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचे कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणे आणि ताबडतोब कामाला लागणे. २१-३० वयोगटातील सुमारे ७५म कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अविश्रांत काम करत राहातो. जेवणासाठीही ब्रेक न घेता काम करता करता एकीकडे खात राहातो. यामुळे डीप व्हेन थ्रंबोसिस या आजाराची शक्यता दुपटीने वाढते. डीव्हीटीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत जातात.
डीव्हीटी चॅरिटी लाइफब्लडटआ अन्या स्टीफन्स-बोल या संदर्भात बोलताना म्हणाल्या, ’बर्‍याच वेळा असे होते, की आपण तासन् तास काम करत राहातो. आणि काम करता करताच एखादा सँडविच बसल्या जागी संपवतो.’
नव्या आकडेवारीतून हे स्पष्ट होऊ लागले आहे की डीव्हीटीमुळे मरणार्‍यांची संख्या वाढत आहे. यातील बहुसंख्य लोक ४०च्या आतील वयोगटतले आहेत. २००७ साली डीव्हीटीने मरण पावणार्‍यांची संख्या ६७ होती ती २०१० साली ९४ झाली. यामध्ये ४०म वाढ होत आहे. या आजारामुळे धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात आणि फुप्फुसांपर्यंत रक्तापुरवठा होण्यास अडचमी येतात. यातल्या कित्येक केसेस या उपचारांच्या पलिकडे जात असल्याची भीतीही अन्या स्टीफन्स-बोल यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांच्या मते डीव्हीटीपासून बचाव करण्यासाठी सतत हलचाल करायला हवी. सतत एकाच जागी बसून न राहाता थोड्यावेळ फइरणे, अतिरिक्त वजन कमी करणे तसेच धूम्रपान कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय आहारातील मीठाचे प्रमाण कमी केल्यास डीव्हीटीचा धोका टळू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment