… ‘हे’ आहे भारतातील लाजिरवाणे सत्य: राहुल गांधी

नवी दिल्ली: भारतातील काही लोक दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांना माणूस मनात नाहीत. हे भारतातील लाजिरवाणे सत्य आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हाथरस प्रकरणी उत्तरप्रदेशचे उख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्य पोलिसांनाही त्यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे.

हाथरस प्रकरणी कोणावरही लैंगिक अत्याचार न झाल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांनी केला आहे. कारण पीडिता आणि तिचे कुटुंबीय हे त्यांच्या दृष्टीने कोणीच नाहीत, अशा अर्थाचे ट्विट गांधी यांनी केले आहे.

हाथरस येथील कथित सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दाखविलेली असंवेदनशीलता आणि प्रामुख्याने पीडितेच्या कुटुंबाची संमती नसतानाही पोलिसांनी तिच्या मृतदेहावर रात्री उशीरा घाईघाईने केलेले अंत्यसंसकार यामुळे देशभरातून टीकेची झोड उठली. पीडितेचे कुटुंबीय आणि पूर्ण गाव ‘सील’ करून राजकीय नेते आणि माध्यम प्रतिनिधींना तिथे जाण्यापासून रोखल्याबद्दल विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांकडूनही आदित्यनाथ यांची कानउघाडणी करण्यात आली आहे.