सुशांत सिंह प्रकरणी ‘आज तक’ला एक लाख रुपयांचा दंड


नवी दिल्ली – नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर इतर तीन वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांच्यावर ही कारवाई सुशांतसिंग प्रकरणात वृतांकन मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल करण्यात आली आहे. आज तकला माफी मागण्याचे तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज 24 या तीन वृत्तवाहिन्यांना जाहिर माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायामूर्ती ए. के. सिक्री यांनी दिला असून याप्रकरणी सौरव दास यांनी तक्रार केली होती. सौरव यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन एनबीएसएच्या सर्व आदेशाची माहितीही दिली आहे.