यंदाची निवडणूक अमेरिकन इतिहासातील सर्वात खर्चिक

फोटो साभार सीएनबीसी

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक इतिहासात या वर्षाची निवडणूक सर्वाधिक खर्चिक असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी शेवटचे मतदान ३ नोव्हेंबर रोजी होत आहे. म्हणजे अजून १ महिना वेळ आहे आणि आत्ताच निवडणुकीसाठी झालेला खर्च ५४ हजार कोटींवर गेला आहे. यंदाचा अंतिम खर्च ८८ हजार कोटींवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण खर्च ५० हजार कोटी होता.

निवडणूक खर्च देखरेख संस्था सेंटर फॉर रीस्पोन्सिव्ह पॉलीटीक्स (सीपीआर)च्या सीईओ शिला क्रुमोलन यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत रेकॉर्डतोड फंडिंग झालेले दिसून आले आहे. इतक्या प्रचंड फंडिंगची आम्ही कल्पना केली नव्हती. अमेरिकेच्या इतिहासात ही सर्वाधिक महागडी निवडणूक ठरली आहे. करोना महामारी मुळे व्होटर्स आणि देणगीदार यांच्या समक्ष भेटी घेता येणे शक्य झालेले नाही त्यामुळे डिजिटल माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यास प्राधान्य दिले गेले आहे. त्याच माध्यमातून व्होटर्स ना खर्च करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यात बायडेन टीम आघाडीवर आहे. त्यांनी सप्टेंबर पर्यंतच जाहिरातींवर ६८६ कोटी खर्च केला असून ट्रम्प टीमचा खर्च २९८ कोटी आहे.

बायडेन टीम ने फेसबुक, गुगलवर दिलेल्या जाहिरातीपोटी २३४ कोटी खर्च केला आहे तर ट्रम्प टीमचा हा खर्च १६७ कोटी आहे. या एकूण खर्चात डेमोक्रॅटिक उमेदवाराचा वाटा  ५४ टक्के तर रिपब्लिकन उमेदवाराचा खर्च वाटा ३९ टक्के असल्याचे समजते.