कानाची काळजी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की हैराण करतात. कानदुखीचा अनुभव हा बहुतेक प्रत्येकाने सोसलेला असतोच. कानाच्या विकारांवरही घरच्या घरी सोपे उपाय करता येतात ते असे-

१)कान दुखणे- गरम पाण्याच्या पिशवीने कान शेकावा. तेल घालू नये.

२)कानात काही गेल्यास – पाखरू, तुकडा, काडी मोडणे कानात गेलेली वस्तू शक्यतो आपसूकच बाहेर येते असते. पण काडी वगैरे अडकून बसल्यास तज्ञ डॉक्टरांकडून काढून आणावी. आपणच कान कोरणे वगैरे प्रकार करून नयेत.

३)कान फुटणे- नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा हा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय  करावेत.

४)कानात दडे बसणे – कान शेकावा अथवा कोणत्याही उपायाने शिंका काढाव्यात. त्यामुळे कानातले दडे कमी होतील.

५)कानात मळ साठल्यास – कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपाआप बाहेर पडतो.काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.

६)कान चिघळणे – बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.

७)कान खाजणे – कान कोरडा पडून खाजत असल्यास कापसाने आतून तेलाचा लेप लावावा.तेल कानात ओतू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment