या दिवशी आणि या ठिकाणी रिलीज होणार सारा आणि वरुणचा ‘कूली नं. १’


गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता त्याचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट आता जाहिर करण्यात आली आहे.

वरुण धवनने ट्विट करत नुकतीच चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. येत्या ख्रिसमसला अॅमेझॉन प्राईमवर ‘कुली नं. १ हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. हा चित्रपट यापूर्वी १ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट आता २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.


१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.