लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच


पाटना – चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. पण त्यांची दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने तूर्तास त्यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.

लालूप्रसाद यादव यांनी चाईबासा प्रकरणात त्यांची अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी या प्रकरणातील अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानेच जामिनासाठी अर्ज केला होता. सीबीआयने गेल्या सुनावणीत अद्याप अर्धी शिक्षा बाकी होण्यासाठी २६ दिवस बाकी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी आजपर्यंत म्हणजेच ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.