कोरोना लसीसंदर्भात मॉडर्ना कंपनीने घेतला महत्त्वाचा निर्णय


नवी दिल्ली – जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा प्रकोप रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. त्याचबरोबर जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाचा बिमोड करणारी लस अथवा औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करत आहे. तसेच शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसींच्या चाचण्यांना देखील अनेक ठिकाणी यश आले आहे. त्यातच आता तब्बल तीन कोटींचा टप्पा जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पार केला असून या जीवघेण्या रोगामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमवाला आहे. याच दरम्यान कोरोना लसीसंदर्भात अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन औषधनिर्माण करणाऱ्या कंपनीने यासंदर्भात गुरुवारी प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये एक मोठी घोषणा लसीसंदर्भात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे औषध कंपन्याना मोठा फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.


कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचणीवर मॉडर्ना कंपनी सध्या काम करत आहे. तसेच चाचण्यांचे परिणामदेखील देखील उत्तम येत आहे. कंपनीकडून कोरोना लसीचे पेटंट करण्यासाठी इतर कंपन्यांवर कोरोनाच्या काळात दबाव आणणार नसल्याचे, कंपनीने आता म्हटले आहे. याबाबतची माहिती आपल्या प्रेसनोटमध्ये कंपनीने दिली आहे. हा निर्णय कोरोना साथीच्या काळात हा महामारीशी लढा देण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती दिली. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू असून ठिकठिकाणी अद्यापही संशोधन सुरु असून संशोधनातून सातत्याने महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांनी मिळून तयार केली आहे. सध्या पहिल्याच टप्प्यातील चाचणी ही लस करत आहे. या लसीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे निरीक्षणात दिसून आले आहे. यासंदर्भात ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत ज्या व्यक्तींना mRNA-1273 ही लस देण्यात आली, त्या व्यक्तींवर या लसीचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. एनआयएआयडी संशोधकांच्या मते, कोरोनाचा धोका वृद्ध लोकांमध्ये अधिक असतो आणि हा धोका नष्ट करणे, कमी करणे यासाठी ही लस महत्त्वपूर्ण असल्याचे वृत्त एका हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.