सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ भारतात लाँच

दीर्घ प्रतिक्षेनंतर कोरियन जायंट कंपनी सॅमसंगने त्यांचा एफ सिरीज मधला पाहिला स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ भारतात लाँच केला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी अशी त्याची खास फिचर्स आहेत. फ्युजन ग्रीन, फ्युजन ब्ल्यू आणि फ्युजन ब्लॅक अश्या तीन कलर व्हेरीयंट मध्ये आणि ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज अश्या दोन स्टोरेज व्हेरीयंट मध्ये हा फोन ग्राहकांना उपलब्ध आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने मेमरी वाढविण्याशी सुविधा या फोन मध्ये मिळणार आहे.

या फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांना १६ ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. याच दिवशी सुरु होत असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज मध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर तो कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर आणि निवडक ऑफलाईन स्टोर्स मध्येही विकत मिळू शकणार आहे.

या स्मार्टफोन साठी ६.४ इंची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड इन्फिनिटी यु डिस्प्ले दिला असून बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ६४ एमपी + ८ एमपीचा अल्ट्रा वाईड सेन्सर + ५ एमपीचा तिसरा सेन्सर असा ट्रिपल कॅमेरा सेट असून सेल्फी आणि व्हिडीओ साठी ३२ एमपीच फ्रंट कॅमेरा आहे. ६४ जीबी स्टोरेज फोनची किंमत १६९९९ रुपये तर १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७९९९ रुपये आहे.