करियर निवडताना

career

करियरची योजना हि जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून ,नौकरी मिळवण्यापासून आणि त्यात
प्रगती करण्यापासून होते . योग्य करियर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना हुशारीने निर्णय महत्वाचे ठरते .करियरची निवड हे खरोखर वेळखाऊ काम आहे.इथे दिलेल्या काही सूचना तुम्हाला कोणता विषय व करियर निवडावे यात मदत करतील .

आवड :- करियर निवड करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आवड . कोणत्याही विषयाचे अध्ययन करताना , लेक्चर , ऐकताना ,प्रक्टिकल करताना किवा
अभ्यासक्रम पूर्ण करतांना आनंद लुटण्यास महाविद्यालीय दर्जात सुधारणा होण्याच्या आणि पुढे कामकाजी जीवनास सुरवात केल्यावर व्यवसायात यशस्वी
होण्याच्या संधी मध्ये वाढ होते.

कौशल्य :- करियर निचित करताना विचारात घेण्याजोगी आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडील  कौशल्यसंच . कुटुंबातील सदस्यांशी , मित्रांशी  आणि
शिक्षकांशी बोलून तुमच्या कौशल्यविषयी अधिकाधिक जाणून घ्या . ज्यात तुमच्यातील नैसर्गिक कौशल्ययांचा संच उपयोगात आणला जातो , असा अभ्यासक्रम
शिकताना अभ्यासात यशस्वी होण्याच्या आणि व्यवसायीक प्रगती साधण्याच्या संधी वाढतात .

प्राधान्यक्रम :- तुमच्या निवडीचा प्राधन्य क्रम ठरवा . काम करताना आरामदायी वाटत असेल तर त्या आणि त्यातून तुमच्या गरजांची पूर्तता होत असेल तर त्या कामातून आनंद मिळतो . उदा . तुम्हाला प्रवासाचा तिटकारा असेल तर पर्यटन व्यवसायातील करीयरची  निवड करू नका .

कामाचा वातावरणाशी निवड :- जीवनशैलीला अनुरूप असे वातावरण निवडल्यास , ते तुमच्या कामकाजी जीवनास फायदेशीर ठरते . यात भवताल लोक आणि तुमच्या पसंतीची कामे यांचा समावेश होतो . उदा. तुम्हाला दम्याचा विकार असल्यास सिविल इंजिनीरिंग चा  अभ्यासक्रम निवडू नका , कारण त्याला प्रत्यक्ष
कार्यस्थळावर जावून खूप काम करावे लागते.

कामातील समाधान : कामातील समाधान फार महत्वाचे आहे . समाधानाची जाणीव करून देणाऱ्या करीयरची निवड महत्वाची आहे आणि तीच यशाची अंतिम गुरुकील्लि  आहे. उदा. तुम्हाला आरेखन करायला आवडत असल्यास वास्तुकलेतील अभ्यासक्रम निवडा . खेळ ,चित्रकला , डिझायनिंग अशा तुम्हाला सर्वाधिक आनंद देणाऱ्या पर्यायाची निवड करा .

Leave a Comment