हा अभिनेता साकारणार ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकमध्ये मुख्य भुमिका


आतापर्यंत भारतीय खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आपण पहिले आहेत. त्यानंतर आता तुमच्या भेटीला श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार विजय सेथुपती मुख्य भूमिका साकारणार असून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. यासंदर्भातील माहिती चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत दिली आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील लवकरच करण्यात येणार आहे.


ही बातमी चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला आणि चित्रपट समीक्षक सेथुपती आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. रमेश बाला यांनी ट्विट करत लिहिले की, आता मुथय्या मुरलीधरनच्या अवतारात विजय सेथुपती दिसणार आहे. याच वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट तरण आदर्श यांनी देखील केले आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाची घोषणा होताच अभिनेता विजय सेथुपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. या ट्विटवर दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या बायोपिकची निर्मिती तमिळ भाषेत होणार असून, जगभरातील इतर भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता विजय सेथुपती याचा मोठा चाहता वर्ग असून, या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.