शिवसेनेचे 20 स्टार प्रचारक उरलीसुरलेली अब्रू बिहारमध्ये जाऊन घालवणार – निलेश राणे


मुंबई – अवघे काही आठवडे बिहार विधानसभा निवडणुकीला उरलेले असल्यामुळे सर्वच पक्षांची निवडणुकीच्या तयारीची लगबग सुरु आहे. या निवडणुकीच्या रिंगणात यंदा शिवसेनाही उतरली आहे. शिवसेनेने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. भाजप नेते निलेश राणे यांनी यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे स्टार प्रचारक बिहारमध्ये जाऊन स्वतःची उरलीसुरली पण अब्रू घालवणार, या शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.


त्याचबरोबर शिवसेनेने महाराष्ट्र सोडून ज्या राज्यात उमेदवार उभे केले त्या राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ह्या स्टार कॅम्पेनर्स महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास असल्याची टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.