वायुसेना दिनाच्या निमित्ताने कंगना राणावतने केले ‘तेजस’चे प्रमोशन


भारतीय वायूसेनेच्या शौर्याला आज संपूर्ण देश सलाम करत असून देशातील सर्व नागरिक त्यांच्या शौर्यावर गर्व व्यक्त करत आहे. भारतीय वायूसेना आज आपला ८८वा स्थापना दिवस साजरा करत असतानाच गाजियाबादच्या हिंडन एअरबेसवर या निमित्ताने वायुसेनेने आपले शक्ती प्रदर्शन केले. आता या दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्री कंगना राणावतने देखील वायुसेनेला शुभेच्छा देत आपल्या आगामी तेजस चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.


आगामी तेजस चित्रपटात कंगना राणावत झळकणार असून या निमित्ताने या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. कंगनाने नेहमीप्रमाणे आपल्या लूकने चाहत्यांना चकित केले आहे. भारतीय वायूसेना दिनाच्या निमित्ताने आता कंगनाने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. तिने ट्विट करत लिहिले की, तेजस चित्रपटाच्या टीमकडून सर्वांना एअरफोर्स डेच्या शुभेच्छा. आमचा चित्रपट एअरफोर्सची महानता दर्शवणार आहे आणि त्यांच्या शौर्याला सलाम करणारा आहे. जय हिंद. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०१६ साली भारतीय वायूसेनेने महिलांना लडाखू भूमिकेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. आता कंगनाचा आगामी चित्रपट तेजस याच ऐतिहासिक घटनेवर प्रेरित आहे. वायूसेनेच्या शौर्याला चित्रपटाच्या माध्यमातून सलाम केला जाणार आहे. सर्वेश मेवाडा तेजसचे दिग्दर्शन करत आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे. सध्या कंगना थलाइवी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती तेजस चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार आहे.