बिहार विधानसभेच्या निवडणुकीतून गुप्तेश्वर पांडेंचा पत्ता कट


पाटणा: बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभा निवडणुकीसाठी जेडीयूकडून तिकिट देण्यात आले नाही. नुकतेच पोलिस महासंचालक पदाचा राजीनामा देत गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. पण पक्षाने काल आपल्या कोट्यातील सर्व 115 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. गुप्तेश्वर पांडे यांचे नाव या यादीमध्ये नाही. बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेली असून या जागेवर भाजपकडून परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

अपने अनेक शुभचिंतकों के फ़ोन से परेशान हूँ। मैं उनकी चिंता और परेशानी भी समझता हूँ। मेरे सेवामुक्त होने के बाद सबको…

Posted by Gupteshwar Pandey on Wednesday, 7 October 2020

त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे की, मी माझ्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण मी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचे काहीच कारण नाही. थोडा धीर धरा. संघर्षातच आपले आयुष्य गेले आहे. सार्वजनिक सेवेत मी आयुष्यभर राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिले असल्याचे गुप्तेश्वर पांडे म्हणाले. बक्सर माझी जन्मभूमी आहे. तेथील सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असे गुप्तेश्वर पांडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.