अनलॉकनंतरही वाहनविक्रीत ‘मारुती सुझुकी’ची आघाडी कायम


मुंबई – ‘लॉकडाऊन’च्या काळात ठप्प झालेल्या वाहनविक्री व्यवहारांनी ‘अनलॉक’ नंतर सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा उभारी घेतली आहे. मागील काही काळापासून वाहनविक्रीच्या संख्येत ‘मारुती सुझुकी’ने घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांच्या टॉप १० मॉडेल्समधील तब्बल ५ मॉडेल्स ‘मारुती सुझुकी’ची आहेत.

१) स्विफ्ट: मारुती सुझुकीच्या हॅचबॅक प्रकारातील स्विफ्टने सप्टेंबर महिन्यात २२ हजार ६४३ वाहनांची विक्री करून वाहन विक्रीतील आघाडी कायम ठेवली आहे. मागील वर्षी याच महिन्यात स्विफ्टच्या १२ हजार ९३४ कार्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत या वर्षी या गाडीने विक्रीच्या संख्येत तब्बल ७५ टक्के वाढ नोंदविली आहे.

२) बलेनो: या वर्षी ऑगस्ट महिन्यात सहाव्या स्थानावर असलेल्या बलेनोने सप्टेंबरमध्ये थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सप्टेंबरमध्ये बलेनोच्या १९ हजार ४३३ गाड्यांची विक्री झाली. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हीच संख्या ११ हजार ४२० होती. मागील वर्षीपेक्षा बलेनोच्या या महिन्यातील विक्रीत ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

३) अल्टो: मागील वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांची वाढ नोंदवत अल्टोने या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये १८ हजार २४६ वाहनांची विक्री केली. मागील वर्षी हा आकडा १५ हजार ७९ एवढा होता. मात्र, विक्रीत वाढ होऊनही टॉप १० च्या यादीत अल्टो दसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.

४) वॅगन आर: या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये वॅगन आरच्या विक्रीत किंचित घाट झाली आहे. ऑगस्टमध्ये या मॉडेलच्या १३ हजार ७७० वाहनांची विक्री झाली तर सप्टेंबरमध्ये हा एकदा १३ हजार ५८३ वर आला. त्यामुळे यादीतही वॅगन आरचे स्थान एका अंकाने घसरले आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत या वाहनाच्या विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

५) डिझायर: सेडान श्रेणीतील या कारने सप्टेंबरमध्ये १३ हजार ९८८ वाहनांची विक्री केली. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी याचा महिन्यात १५ हजार ६६२ गाड्या विकल्या गेल्या होत्या.

६) एसयुव्ही श्रेणीतील ह्युंदाई क्रेटा या गाडीने महिला वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल ८२ टक्केतांची वाढ नोंदविली आहे. मागच्या वर्षी या महिन्यात ६ हजार ६४१ वाहने विकली गेली. त्या तुलनेत या वर्षी याच महिन्यात १२ हजार ३२५ कार्सची विक्री झाली आहे. ही वाढ तब्बल ८२ टक्क्यांची आहे.

७) इको: मारुती सुझुकीच्या ‘इको’ मॉडेलने मागील वर्षीच्या ९ हजार ९४९ वाहनांच्या विक्रीत १३ टक्य्यांची वाढ करून या वर्षी सप्टेंबरमध्ये ११ हजार २२० गाड्यांची विक्री केली आहे. मागील महिन्यात मिळविलेल्या १० व्य क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

८) ह्युंदाई ग्रँड आय १०: मागच्या वर्षीच्या विक्रीच्या संख्येत ११ टक्क्यांची वाढ करून आय १० ने या वर्षी सप्टेंबरमध्ये १० हजार ३८५ गाड्यांची विक्री केली आहे.

९) इको: मारुती सुझुकीच्या इकोने मागील महिन्याच्या तुलनेत विक्रीमध्ये वाढ नोंदवित नववे स्थान मिळविले आहे.

१०) आय २० एलिट: मागच्या महिन्यात ह्युंदाईच्या आय २० ने ९ हजार ८५२ गाड्यांची विक्री केली आहे. मात्र, मागील वर्षीच्या सप्टेंबरच्या १० हजार १४१ वाहन विक्रीच्या तुलनेत ३ टक्क्याने घट झाली आहे.