१० वर्षांचे झाले इन्स्टाग्राम

फोटो साभार न्यूज सीबीएस

जगभरात लोकप्रियतेचा विक्रम नोंदविणारे इन्स्टाग्राम १० वर्षाचे झाले. सेलेब्रीटीना आम जनतेपर्यंत पोहोचविणारे इन्स्टाग्राम या काळात बरेच बदलले आहे. त्याचा मालक बदलला आणि व्यवसाय वाढविण्यासाठी एक उपयुक्त प्लॅटफॉर्म अशी ओळख इन्स्टाग्रामने निर्माण केली आहे.

आज इंटरनेट विकास वेगाने होतो आहे आणि त्यामुळे लहान मुलांना सुद्धा इन्स्टाग्राम बद्दल माहिती आहे. या साईटची क्रेझ खूप वाढली असून या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ, फोटो यांचा जणू महापूर आला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर ५० अब्जाहून जास्त फोटो असून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेल्फ मेड अल्बम अशी ओळख इन्स्टाग्रामने मिळविली आहे. इन्स्टाग्राम विषयी काही बाबी आजही अनेकांना माहिती नाहीत. त्या अश्या-

अमेरिकन प्रोग्रामर केविन सिस्ट्रोम व माईक क्रीगर या दोघांनी इन्स्टाग्रामची रचना केली. त्यावर पाहिला फोटो क्रीगरने सॅनफ्रान्सिस्कोच्या त्याच्या कार्यालयातून लोड केला होता. २०१० साली इन्स्टाग्राम सुरु झाले आणि दोन वर्षातच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने ते १ अब्ज डॉलर्सला खरेदी केले. मग ते जगातील सर्वसामान्य नागरिकांना सेल्फी, फोटो अपलोड करण्याची संधी देणारे जगातील पाहिले अॅप बनले.

आज इन्स्टाग्रामचा वापर अनेक उत्पादनांचा लॉन्चिंग प्लॅटफॉर्म म्हणून केला जात असून अनेक लग्झरी ब्रांड साठी इन्स्टाग्राम उत्तम प्लॅटफॉर्म ठरतो आहे. फोटो शेअरिंग बरोबरच फूड सेक्टर व्यवसायासाठी सुद्धा त्याचा चांगला उपयोग केला जात आहे. रेस्टॉरंट त्यांची उत्पादने प्रमोट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम या माध्यमातून करत आहेत. २०१३ ते २०१६ या काळात व्हिडीओ, डायरेक्ट मेसेज, जाहिराती अशी नवी फिचर्स यात आणली गेली आणि या काळात त्याची युजर्स संख्या ४० दशलक्ष युजर्सवर गेली.२०१६ मध्ये इन्स्टास्टोरीज व लाईव्ह स्टोरीज ही फिचर्स आली असून आणखीही काही नवी फिचर्स त्यात सामील केली जात आहेत.