अटल बोगद्यातून पहिला लष्करी वाहन ताफा रवाना

फोटो साभार एएनआय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास जवळ बांधण्यात आलेला अटल टनेल ३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्राला अर्पण केल्यावर बुधवारी या बोगद्यातून पाहिला लष्करी वाहन ताफा रवाना झाला. या लष्करी वाहनात सेनेचे ट्रक आणि अन्य वाहने होती. लडाख भागातील सैनिकांच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंची वाहतूक त्यातून केली गेली असे सांगितले जात आहे.

अटल बोगदा एलएसी भागात लष्करी हालचाली करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या बोगद्यामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनेक पटीनी वाढले आहे. ८.८ किमी लांबीचा आणि ३ हजार मीटर म्हणजे सुमारे १० हजार फुट उंचीवर बांधला गेलेला जगातील हा पहिला सर्वात मोठा बोगदा आहे. हा बोगदा म्हणजे लेह लडाखची जीवनरेषा बनला आहे. या बोगद्यामुळे मनाली केलोंग अंतर ३ ते ४ तासानी कमी झाले आहे.

रोहतांग दरी जवळ हा बोगदा बांधला गेला असून हा बोगदा बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय ३ जून २००० मध्ये घेतला गेला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. निसर्गाचे मोठे आव्हान पेलून हा बोगदा बांधला गेला आहे.