शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या पद्धतीमुळे 30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य


नवी दिल्ली – विविध देशांतील शास्त्रज्ञ संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करणारी लस शोधण्यात गुंतलेले असतानाच आता लवकरात लवकर कोरोनाचे निदान करणे शक्य व्हावे, यासाठी एक नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केल्यामुळे कोणालाही अवघ्या 30 मिनिटांत कोरोनाचा सहज आणि त्वरित शोध घेणे शक्य होणार आहे.

यात सध्याच्या पीसीआर डायग्नोस्टिक चाचणी एवढीच अचूकता असणार आहे. विषाणूच्या आरएनए क्रमांकावर आधारीत कोरोनाचे निदान दक्षिण कोरियामधील पोहंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी विकसित केलेल्या या सेन्सर तंत्रज्ञानामुळे झाले आहे. ज्यामुळे एकाच तपासणीच्या जागी येणारा ताण कमी होण्याबरोबरच संक्रमित रुग्णांशी संपर्क साधणे टाळता येऊ शकणार आहे. सेन्सर तंत्रज्ञानाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे डायग्नोस्टिक डिव्हाईस तयार करणे सुलभ आहे, जे एक सहज पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ फॉर्ममध्ये विकसित केले जाऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.