आश्चर्यच! तब्बल 31.8 मिलियन डॉलरला ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossilची विक्री


न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil ला विक्रमी किंमत मिळाली असून ही रक्कम मागील लिलावाच्या अनेकपट असून 31.8 मिलियन डॉलर म्हणजेच 2,33,20,49,820 कोटी रुपये एवढी किंमत या जीवाश्मांना मिळाली आहे. ही रक्कम आतापर्यंत लिलावात मिळालेली सर्वाधिक असून या फॉसिलची सुरुवातीची किंमत लिलावात सहा ते आठ मिलियन डॉलर ठेवण्यात आल्यानंतर यावर लिलावात मोठी रक्कम लावून हे विकत घेण्यात आले. हॉंगकॉंग आणि लंडन या देशांमधून देखील यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला होता. अखेर ही मोठी रक्कम मोजत हे फॉसिल Christie’s या संस्थेने विकत घेतले.

याआधी Sue नावाच्या Specimen ला सर्वात मोठी रक्कम ही लिलावात मिळाली होती. शिकागोच्या Field Museum of Natural History मध्ये ऑक्टोबर 1997 साली 8.4 मिलियन डॉलर एवढी रक्कम मिळाली होती. जगभरात आतापर्यंत केवळ 50 Tyrannosaurus fossils आढळून आले आहेत. 1902 मध्ये पहिला फॉसिल आढळून आला होता.

दरम्यान स्टॅन असे नाव 31.8 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलेल्या या फॉसिलला देण्यात आले असून 13 फूट उंच आणि 40 फूट याची लांबी आहे. हे फॉसिल 1987 साली दक्षिण डकोटा मध्ये सापडले होते. यामध्ये याच्या कवटीवर आणि मानेवर असलेल्या खुणांमुळे त्याच्याबरोबरच्या T-Rexes या डायनासॉरशी भांडण झाल्याचे पुरावे मिळत असल्याचे संशोधकांनी म्हटले होते. त्याचबरोबर त्याचे वजन 67 लाख वर्षांपूर्वी 8 टन असेल असा अंदाज देखील वर्तविला होता. त्यामुळे जर खासगी जागेत हे फॉसिल सापडले असेल तर त्याचा लिलाव करता येऊ शकतो. त्यामुळे या फॉसिलचा लिलाव झाला.

यावर 30 हजार तास काम करून दक्षिण डकोटामधील Black Hills Institute of Geological Research मधील Paleontologists नी 188 हाडे बसवून हा सांगाडा तयार केला आहे. हा सांगाडा खरेदी करण्यासाठी लिलावात मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती. लिलावाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत याची रक्कम 9 मिलियन डॉलर अर्थात 66,00,14,100 कोटी रुपयांवर गेली होती. त्यानंतर 14 मिनिटांनी या लिलावात केवळ 3 जण शिल्लक होते. त्यामुळे अखेर 27.5 मिलियन डॉलर म्हणजेच 2,01,60,11250 कोटी रुपये या रकमेवर हा लिलाव थांबला. त्याचबरोबर इतर टॅक्स आणि कमिशन मिळून याची रक्कम 31.8 मिलियन डॉलर म्हणजेच 2,33,20,49,820 कोटी रुपये एवढी झाली.