अनुष्का, तब्बू, तापसीचा ऑनलाईन सर्च पडेल महागात

फोटो साभार अमर उजाला

अँटीव्हायरस बनविणारी सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनी मॅकेफी इंडियाने इंटरनेट युजर्ससाठी आणि त्यातही बॉलीवूड स्टार्सचा ऑनलाईन सर्च करणाऱ्यांना महत्वाचा इशारा दिला आहे. त्यानुसार तब्बू, तापसी पनू, अनुष्का शर्मा यांचा इंटरनेट सर्च युजरला चांगलाच महागात पडू शकेल असे स्पष्ट केले आहे.

मॅकेफी  इंडियाचे उपाध्यक्ष वेंकट कृष्णा म्हणाले कंपनी दरवर्षी इंटरनेट सर्च व्हायरस संपर्कात येण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या काही सर्च बद्दल माहिती देऊन युजर्सना सावधानतेचा इशारा देत असते. २०२०च्या आंतरराष्ट्रीय यादीत फुटबॉल खेळाडू रोनाल्डो याचा पाहिला नंबर असून त्याचा सर्च करणे युजर्सना महागात पडू शकते. त्याचप्रमाणे पहिल्या दहा नंबरवर बॉलीवूडचे वर्चस्व असून त्यात रोनाल्डो नंतर तब्बू २ नंबरवर, तापसी पनू तीन, अनुष्का शर्मा चार, सोनाक्षी सिन्हा पाच नंबरवर आहेत.

युजर्स मोफत मिळते म्हणून इंटरनेटवर अधिकाधिक मनोरंजन साईट्स सर्च करतात आणि त्याचा अचूक फायदा सायबर गुन्हेगार घेतात. मोफत क्रीडा, चित्रपट, वेबसिरीज पाहण्याचा युजरचा प्रयत्न असतो आणि त्यात स्वतःच्या सुरक्षेशी युजर तडजोड करत असतो. यामुळे त्यांचे डिजीटल जीवन जोखीमिचे बनते. पर्सनल डेटा लिक होऊ शकतो आणि त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते. त्यामुळे असे सर्च करताना युजर्सने सतर्क असले पाहिजे.

वरील यादीत सहा नंबरवर गायक अरमान मलिक, ७ नंबरवर सारा अली खान, ८ नंबरवर टीव्ही कलाकार दिव्यंका त्रिपाठी, नउ नंबरवर शाहरुख खान आणि दहा नंबरवर गायक अरजीत सिंग हे असल्याचे दिसून आले आहे.