अभिनेत्री काजल अगरवाल चढणार बोहल्यावर; ‘या’ तारखेला होणार विवाहबद्ध


अभिनेता अजय देवगणच्या सिंघम चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच व्यावसायिक गौतम किचलूशी विवाहबद्ध होणार असून याबाबतची घोषणा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. काजलच्या लग्नाच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत्या. काजलने या चर्चांना सोशल मीडियावर पोस्ट लिहित पूर्णविराम दिला आहे.

View this post on Instagram

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on


इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, मी हो म्हणाले. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचे प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद! काजल लग्नानंतर चित्रपटसृष्टीत कार्यरत रहाणार का? या प्रश्नाचेही तिने उत्तर या पोस्टमध्ये दिले. मी लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत कार्यरत राहणार असल्याचे तिने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केले आहे.