जगात फक्त एका महिलेला येते ही भाषा

फोटो साभार कॅच न्यूज

जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात आणि ही संख्या ६९०० पेक्षा अधिक आहे असे आकडेवारी सांगते. यातील अनेक भाषा लुप्त झाल्या आहेत तर काही लुप्त होण्याचा मार्गावर आहेत. काही भाषा हजारो वर्षे जुन्या आहेत आणि त्या बोलणारे किंवा जाणणारे लोक नाहीत अशी परिस्थिती सुद्धा आहे. अशीच एक भाषा आहे यघान. संस्कृतला जवळची असलेली ही भाषा अर्जेंटिना आणि चिली या देशांच्या मध्ये असलेल्या टीएरा डेल फ्युगो बेटावर राहणारे आदिवासी बोलत असत. आता ही भाषा जाणणारी केवळ एक महिला सध्या जिवंत असून तिचे नाव आहे क्रिस्टीना काल्डेरॉन.

क्रिस्टीनाला स्थानिक लोक अबूइला या नावाने ओळखतात. या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे आजी. तिच्या घरात अन्य माणसे आहेत पण ते स्पॅनिश आणि इंग्रजी भाषा जाणतात. यघान भाषा त्यांना थोडी समजते पण बोलता येत नाही.

या भाषेचे अस्तित्व क्रिस्टीना मुळे अजून टिकून राहिले आहे आणि त्यासाठी तिला अनेकदा सन्मानित केले गेले आहे. २००९ साली चिली सरकारने तिला लिव्हिंग ह्युमन ट्रेझर ही पदवी दिली आहे. संकृती जपणाऱ्याचा सन्मान म्हणून ही पदवी दिली जाते.

यघान हे वास्तवात बंजारी लोकांच्या समुदायाचे नाव होते. पोर्तुगीज लोकांना प्रथम १५२० मध्ये या काफिल्याची माहिती मिळाली होती. क्रिस्टीना आज सरकारी मदत घेऊन ही भाषा टिकविण्याचा प्रयत्न करते आहे. अर्जेंटिना मधील अनेक शाळात जाऊन क्रिस्टीना ही भाषा तेथील विद्यार्थ्यांना शिकविते असे समजते.