ट्रम्प घरी परतले, प्रेस सेक्रेटरी कायले करोना संक्रमित

फोटो साभार न्यूज चान्ट

अमेरिकेचे  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोना पोझिटिव्ह आल्यावर ग्रेट वोल्टर आर्मी रुग्णालयात तीन दिवस उपचार घेऊन व्हाईट हाउस मध्ये परतले असताना आता व्हाईट हाउस मधील प्रेस सेक्रेटरी कायले मॅक्नेनी करोना संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे. कायलेने या संदर्भात ट्विटरवर माहिती दिली असून ती सांगते गुरुवार पासून तिची सातत्याने करोना टेस्ट केली जात होती ती रविवार पर्यंत निगेटिव्ह येत होती मात्र सोमवारी तिची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली आहे.

गुरुवारी कायले हिने शेवटची पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर तिच्या संपर्कात कुणीही पत्रकार अथवा अन्य प्रेस सदस्य आलेले नाहीत. सर्वात प्रथम ट्रम्प यांची सल्लागार हॉप हिक्स हिची करोना चाचणी पोझिटिव्ह आली होती त्यानंतर डोनल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया करोना संक्रमित झाल्याचे दिसून आले होते.

ट्रम्प यांची तब्येत वेगाने सुधारत असल्याने त्यांना घरी पाठविले गेले आहे आणि घरीच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रॉयटरच्या बातमीनुसार ट्रम्प अद्यापी पूर्ण बरे झालेले नाहीत पण त्यांना व्हाईट हाउस मध्ये परतण्याची परवानगी दिली गेली आहे. ट्रम्प १५ ऑक्टोबर रोजी मियामी येथे होणाऱ्या डीबेट मध्ये सामील होऊ शकतात असे संकेत दिले गेले आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी करोनाला मुळीच घाबरू नका असा संदेश नागरिकांना दिला आहे.