करोना मुळे रावण, मेघनाद, कुंभकर्ण पुतळे उंची घटली

फोटो साभार इंडिया डॉट कॉम

यंदा देशात करोनाच्या साथीमुळे नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्वरुपात रामलीला साजरी केली जाणार नाही मात्र असत्याचा सत्यावर विजयाचे प्रतिक असलेले रावण दहन केले जाणार आहे. यंदा करोना मुळे रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांची उंची कमी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी प्रथेप्रमाणे रावणाचा पुतळा ६० फुट, मेघनादचा पुतळा ५५ फुट आणि कुंभकर्ण पुतळा ५० फुटाचा असतो. या वर्षी मात्र हे पुतळे १० ते २० फुटाचेच बनविले जात आहेत.

रामलीला मैदानावर रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असले तरी फक्त २०० लोकांच्या सहभागाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दहन कार्यक्रम युट्यूब, फेसबुकवर ऑनलाईन प्रक्षेपित केला जाणार आहे. मैदानात जत्रा, खाण्याचे स्टॉल लावायची परवानगी दिली गेलेली नाही. रामलीला मैदानाचे भूमिपूजन रविवारी झाले आहे. या मैदानावर मोठे स्क्रीन लावून तेथे जुन्या रामलीला प्रोजेक्टरच्या मदतीने दाखविल्या जाणार आहेत.

मैदानात रावण दहन कार्यक्रमाला मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यावेळी सोशल डीस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे असे सांगितले जात आहे.