पीयूष गोयल यांचा अजब गजब दावा; पावसामुळे लादली कांद्यावर निर्यातबंदी


मुंबई – केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी रविवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात पावसाची दाट शक्यता आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा खराब होण्याची शक्यता असून त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याच्या भीतीने आम्ही आधीच निर्यात बंद केली, असा अजब दावा केला. तसेच देशातील कांद्याच्या भावावर निर्यातबंदीमुळे काही एक परिणाम झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.

पीयुष गोयल पुढे म्हणाले, वर्षानुवर्षे जोखडात अडकलेल्या भारतातील शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यामुळे आम्ही मुक्त केले आहे. त्यांची या कायद्यामुळे येणाऱ्या वर्षात प्रचंड प्रगती होईल, आपला माल भारतातील आता शेतकरी कोणत्याही बाजारपेठेत जाऊन विकू शकतात. पण आपला राजकीय फायदा साधण्यासाठी विरोधक या कायद्याच्या विरोधात गैरसमज निर्माण करत असल्याचे देखील ते म्हणाले.