लवकरच करणार विवाहबद्ध होणार नेहा कक्कर !


बॉलीवूडमध्ये अल्पवधीतच यशाच्या शिखरावर पोहचलेली प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण आता पुन्हा एकदा नेहा कक्करच्या प्रेमाची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. आपला मित्र रोहनप्रीत सिंहसोबत लवकरच नेहा लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पण या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत नेहा आणि रोहनप्रीत लग्न करणार आहेत. दिल्लीत हे लग्न होणार असून कोरोनाच्या संकटामुळे खूप कमी लोकांची उपस्थिती असणार आहे. पण हे वृत्त रोहनप्रीतच्या मॅनेजरने नाकारले आहे. दोघांनी एकत्र व्हिडिओ केल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. रोहनप्रीतचा सध्या तरी लग्न करण्याचा कोणताही विचार नाही.

रोहनप्रीत आणि नेहाने काही दिवसांपूर्वी एक म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये नेहा, रोहनप्रीतशी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याबाबत बोलत आहे. दोघांच्या लग्नाची ही हिंट असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ रोहनप्रीतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नेहा त्याच्याकडे डायमंड रिंगची मागणी करत आहे. या व्हिडिओत रोहनप्रीत तिला अंगठी घालताना दिसत आहे.