भारतात लाँच झाला 5G सोबत दोन स्क्रीनवाला Motorola Razr


मुंबई : व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे मोटोरोला रेझर 5G हा स्मार्टफोन मोटारोलाने लाँच केला असून, फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर काही मोजक्या स्टोअरमध्येसुद्धा हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. अमेरिकेमध्ये मागच्या महिन्यात मोटोरोलाने Razr 5G हा मोबाईल फोन लाँच केला होता तेव्हा तिथे ह्याची किंमत $1,399 म्हणजे 1,03 लाख रुपये होती. तज्ज्ञांच्या मते भारतामध्ये या फोनची किंमत एक लाखाच्या आसपासच असणार आहे.

फोनच्या वैशिष्ट्यबद्दल सांगायचे झाले तर या फोन मध्ये 2142×876 पिक्सल रिझोल्युशनसह 6.2 इंचांची प्लॅस्टिक OLED प्रायमरी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन फोल्डेबल डिस्प्ले 21:9 च्या अस्पेक्ट रेशोबरोबर येत असून कंपनीचा दावा आहे की फोनचा डिस्प्ले 2 लाख वेळा न थांबता फोल्ड आणि अनफोल्ड करता येऊ शकतो.

600×800 पिक्सल रिझोल्युशनच्या बरोबर 2.7 इंचांचा एक OLED सेकंडरी डिस्प्ले फोनमध्ये देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो 4:3 आहे. तसेच या फोनच्या फ्रंट फ्लिप पॅनलवर डिस्प्ले लावलेला असल्यामुळे यूजर फोन अनफोल्ड न करता नोटिफिकेशन्स चेक करू शकतात. हा फोन 256GB च्या इंटरनल मेमरीमध्ये येणार असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 765G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन हा फोन 8GB RAMसोबत देखील मिळू शकणार आहे.

48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये असून हा कॅमेरा फोनच्या फ्लिप पॅनेलवर असल्यामुळे याचा वापर सेल्फीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. तसेच Moto Razer 5G मध्ये 2800mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरफ्रिंट स्कॅनरबरोबर यूएसबी टाइप C सारखी स्टँडर्ड फीचर्स देण्यात आली आहेत.