परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना हटवण्याची मागणी करत कृष्णकुंजवर कोळी भगिनी


मुंबई – बेकायदा मच्छी विक्रेत्यांना हटवा, राजसाहेब परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता, अशी मागणी करत मुंबईतील डोंगरी परिसरातील कोळी मच्छिविक्रेत्या भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. थेट कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या महिला आल्या होत्या. बेकायदा मच्छीविक्रेत्यांना हटवा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज ठाकरेंनी दिले.

कोळी मच्छिविक्रेत्या भगिनींच्या प्रमुख मागण्या

  • डोंगरी परिसरात परप्रांतीय बेकायदा फेरीवाल्यांचा वावर वाढला असून त्यांना हटवण्यात यावे.
  • परप्रांतीय बेकायदा व्यावसायिकांमुळे आम्ही व्यवसाय करु शकत नाही, या प्रश्नी मार्ग काढावा.
  • अनधिकृत मच्छी विक्रेते कोळी बाजाराच्या बाहेर असल्यामुळे आमच्या पोटावर पाय येत आहे, त्यामुळे या प्रकरणी तुम्हीच तोडगा काढावा.