रशियन राष्ट्रपती पुतीन यांचे राजेशाही विमान चर्चेत
फोटो साभार ऑटो इव्होल्युशन
समाजवादी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे जगातील अब्जाधीश जमातीपैकी असून एखाद्या राजासारखे आयुष्य जगतात अशी टीका त्यांच्यावर नेहमी केली जाते आणि त्याविषयीच्या बातम्या अनेकदा येत असतात. सध्या पुतीन यांचे एक राजेशाही विमान विशेष चर्चेत आहे. आयएल-९६-३०० पीयु जातीचे हे जेट बाहेरून सर्वसामान्य विमानाप्रमाणेच दिसते मात्र आतून त्याचा थाट एखाद्या राजाच्या महालासारखा आहे असे सांगितले जाते. या विमानाचे फोटो लिक झाले आहेत.
पुतीन यांच्याकडे चार प्रेसिडेन्शियल जेट विमाने आहेत. त्यापैकी हे जेट ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३४,२८,७५,००,००० रुपये किमतीचे आहे. या खासगी विमानात अंतर्गत सजावटीत सोन्याचा वापर केला गेला असून येथील टॉयलेट सोन्याचे असल्याचे सांगितले जाते. या टॉयलेटची किंमत ४९ लाख रुपये आहे.
या विमानात अलिशान बेडरूम, किचन, मिटींग रूम आहेत. मिटींग रूम मध्ये पुतीन त्यांच्या स्टाफसह हजारो मैल उंचावर गंभीर विषयांवर विचारविमर्श करू शकतात. थकवा आल्यास आरामदायी बेडरूममध्ये विश्रांती घेऊ शकतात. या विमानात जिम सुद्धा आहे त्यामुळे ३८ हजार फुट उंचीवरून प्रवास करतानाही पुतीन त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतात. विमानात दळणवळण साठी खास उपकरणे बसविली गेली आहेत. त्यामुळे खराब हवामानात सुद्धा संपर्क साधण्यात काही अडचण येत नाही.