महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार


मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या नाही तर त्याने आत्महत्याच केली हे आता एम्सच्या विशेष अहवालात स्पष्ट झाले असल्यामुळे त्यावरुन सुशांत सिंह प्रकरणात ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्यानंतर ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली, त्यांनी तोंड न लपवता माफी मागावी, असे रोहित पवार म्हणाले आहेत.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे बिहार निवडणुकीसाठी भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्यामुळे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असा टोला लगावत ज्यांनी महाराष्ट्राची व महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.