कोरोनाबाधित ट्रम्प यांच्यासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे – चीफ ऑफ स्टाफची माहिती


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या तब्बेतीसाठी पुढील ४८ तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. सध्या ट्रम्प यांच्यावर सैन्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना व्हाइट हाऊसमधून मिलिट्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यापूर्वी ऑक्सिजन लावण्यात आले होते. पण, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात कोरोनाची साधारण लक्षणे आहेत.

डॉक्टरांनी याची माहिती वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नेवी कमांडर डॉ. सीन कॉनले आणि इतर डॉक्टरांनी ब्रीफिंग केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करुन दिली होती.