प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबियांच्या वतीने भाजप सरकारला विचारले हे ‘पाच’ सवाल


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून रातोरात मुलीचा केलेला अंत्यविधी, कुटुंबियांवर आणला जाणार दबाव अशा अनेक गोष्टींमुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने मोदी सरकारला पाच प्रश्न केले आहेत.

प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरस पीडितेच्या कुटुंबाचे प्रश्न :-
1. सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
2. हाथरसच्या डीएमला सस्पेंड करण्यात यावे आणि कोणत्याही मोठे पद दिले जाऊ नये
3. आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोलने का जाळला?
4. आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला का धमकावले जातेय?
5. आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल निवडूण आले आहेत, पण आम्ही कसे मान्य करावे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता? हे सवाल उपस्थित केले आहेत.


तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांचा या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणे हक्क असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी काल पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.

यापूर्वी राहुल आणि प्रियंका गांधी एकदा पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 35 खासदारांना घेऊन ते पीडितेच्या घरी जाणार होते. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. पीडित कुटुंबाच्या भेटीनंतरच त्यांनी मोदी सरकारला हे सवाल विचारले आहेत.