फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार एकमेव बॉलिवूड अभिनेता


२०२०मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महागड्या अभिनेत्यांची यादी नुकतीच फोर्ब्सने जाहिर केली असून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या यादीत सर्वाधिक कमाई करणार अभिनेता ठरला आहे. अक्षय कुमार हा फोर्ब्सच्या यादीनुसार जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणार बॉलिवूडचा एकमेव कलाकार आहे.

अक्षय या यादीत सहाव्या क्रमांकावर असून त्याची कमाई ४८.५ मिलियन डॉलर म्हणजेच ३६२ कोटी रूपये एवढी आहे. अक्षय कुमारची यातील सर्वाधिक कमाई जाहिरातींमुळे झालेली आहे. 1 जून 2019 ते 1 जून 2020 च्या कमाईनुसार ही यादी तयार करण्यात आली असून ड्वेन जॉनसन ज्याला सगळे द रॉक नावाने ओळखतात तो या यादीत पहिल्या स्थानावर आहे. द रॉकची कमाई ८७.५ मिलियन डॉलर एवढी आहे.

लवकरच अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या देशांमधील चित्रपटगृहात ९ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा चित्रपट डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ आणि ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.